” परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला”

 

मुंबई | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध घटना घडत असून तपास यंत्रणांची छापेमारी असो अथवा अमरावती दंगल, या सर्व प्रकरणातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाकडून रचलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी अनेकदा केला होता. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका प्रसिद्ध मराठी माध्यमावर दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक प्रश्नांवर मौन सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये झालेले दंगे असतील किंवा परमबीर सिंह यांना फरार घोषित या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहेत.

यामध्ये विशेष असं काही नाही मुंबई आणि ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यासाठी पोलीसांनी चौकशीला बोलवलं आहे पण चौकशीला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांना फरार घोषित केलं गेलं आहे. तसेच सिंह एक आयुक्त राहिले आहेत, आधीचं वक्तव्य आणि आता केलेलं वक्तव्य हे योग्य नाही त्यामुळे त्यांनी केलेलं बदनाम करायला तर केलं नाही ना असा संशय निर्माण होतोय. तसेच ते जर माहित असतं तर त्यांना आता शोधून काढलं असतं. ते सापडले नाहीत म्हणून तर त्यांना फरार घोषित केलं अशी उत्तर गृहमंत्री वळसे पाटील यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीला दिली होती.

Team Global News Marathi: