अजित पवार यांच्या आदेशावरून पोलीस आता अँक्‍शन मोडवर !

 

पुणे | बारामती येथील उपविभागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना गणेश इंगळे यांना केली होती, त्या नंतर पोलिस आता अँक्‍शन मोडमध्ये आले आहेत.

इंगळे यांनी पथकाच्या मदतीने अवैध व्यावसायिकांचा शोध सुरु केला आहे. शहर परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी व त्याचे रसायन पोलिसांना मिळाले. यातील तिघांना अटक केली असून दोघे जण पळून गेले. हनुमंत बबन लाड आणि मंगेश बबन लोंढे यांसह इतरही तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या पुढील काळात कुटुंबीयांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती गणेश इंगळे यांनी दिली. बारामती, इंदापूर तालुक्‍यातील अवैध दारु व्यवसाय करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरु झाली आहे. अशा वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यावसायिकांवर झोपडपट्टी दादा कायदाअंतर्गत कारवाई होणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांनी कारवाईची व्याप्ती अधिक वाढवून अवैध दारु व्यावसायिकांना दारु पुरविणाऱ्या वाईन शॉप व बार मालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसांत पोलिसांनी २१ गुन्हे दाखल केले असून २४ जणांवर कारवाई केली आहे.

Team Global News Marathi: