पेपर फुटला नाही, फक्त काही भाग व्हॅटस-अँपवर, शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, शनिवारी पार पडलेला केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे एकच खळबळ उडाली होती . मुंबईच्या मालाडमध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार समोर आला. यानंतर नगरच्या श्रीगोंद्यातही गणिताचा पेपर फुटल्याचं समोर आलंय. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मालाडमध्ये रसायनशास्त्राच्या पेपरबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. संबंधित प्रकार गंभीर असून त्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलं आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, पेपर फुटला नसून प्रश्नपत्रिकेतील काही भाग मोबाईलवर आढळल्याची माहिती त्यांनी दिली. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिकेतील काही माहिती समोर आली होती. मालाडच्या एका खासगी क्लासमध्ये हे प्रकरण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी एका शिक्षकालाही ताब्यात घेतलं आहे.

मुंबईच्या मालाडमध्ये कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

Team Global News Marathi: