सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय

 

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे तर दुसरीकडे या कारवाईवर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांच्या घराची झाडाझडती सुरू झाली आहे. यासंदर्भात, “रोज सकाळी आपल्या सर्वांची सकाळ खराब करणाऱ्यांचीच सकाळ आता खराब झाल्याने, निश्चितपणे समाधान वाटत आहे. तसेच पत्रचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, जे मराठी कुटंब होते. त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे,” असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

राणे म्हणाले, “संजय राऊत नावाचा व्यक्ती स्वतःला फार मोठं समजायची आणि झुकेगा नही वैगेरे डायलॉक म्हणायची, आता त्यांना विचारा आतमध्ये… शेवटी भ्रष्टाचार करायचा, महिलांवर अत्याचार करायचा, त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना वाटत असेल, की त्यांना कधीच काही होणार नाही. तर आता त्यांना, ईडीची चौकशी काय असते आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय असते. हे निश्चित कळत असेल.” असे सुद्धा राणे यांनी यावेळी बोलून दाखविले.

पापाचा घडा भरला की तो फुटतोच, राऊत यांना अटक होणारच- नवनीत राणा

राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला?

 

Team Global News Marathi: