पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

 

समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होण्यापूर्वी तयारीला वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री हे आज शिर्डीचा दौरा करत आहेत.सकाळी 10.30 पासून समृद्धी महामार्गाचा ( झिरो माईल गार्डनपासून) पाहणी दौरा असल्याचे नियोजित दोऱ्यात नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचे होणार उद्घाटन मुंबई आणि नागपूर शहराला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा मुख्यमंत्री नागपूर ते शिर्डी आशा 520 किलोमीटर लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गाची समृद्धी महामार्गावर रस्तेमार्गाने पाहणी करून संध्याकाळी 5.30 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. शिर्डीवरून दिल्लीला जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पार पडणाऱ्या विशेष बैठकीसाठी रवाना होतील.

Team Global News Marathi: