हर हर महादेव सिनेमा टीव्हीवर दाखवू नका, अन्यथा गंभीर परिणामांना तयार राहा

 

हर हर महादेव’ सिनेमावरून महाराष्ट्रात जोरदार वाद सुरु असतानाच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर संभाजीराजेंनी झी स्टुडिओला इशारा दिली आहे. “हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल”, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.

इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजेंनी झी स्टुडिओला दिला आहे.

हर हर महादेव हा चित्रपटाचा 18 डिसेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर असणार आहे. हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाऊ नये, अशी भूमिका सध्या शिवभक्त घेताना दिसत आहेत.

Team Global News Marathi: