पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरापेटीवर चिकटवून त्यावर बुटाचे काळे ठसे उमटवत अरब देशात विटंबना

भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि इथे राजकीय पक्षांमध्ये कितीही वाद असले तरी जागतिक स्तरावर एक देश म्हणून सारे एक असल्याची भावना कायम असल्याचं हिंदुस्थाननं वारंवार सिद्ध केलं आहे. सत्ताधारी भाजपचे विरोधक असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी यांचं उदाहरण दाखवून दिलं आहे. भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून वातावरण तापलं आहे. अरब राष्ट्रांमध्ये तर पंतप्रधान मोदींच्या फोटोची विटंबना करण्यात येत आहे. त्याचा एक फोटो काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट करत असं करणं चुकीचं असून त्याचा निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरापेटीवर चिकटवून त्यावर बुटाचे काळे ठसे उमटवण्यात आले आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत. या विरोधात काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘मोदीजींना आमचा विरोध देशात आहे आणि आम्ही लोकशाही मार्गाने मोदींचा पराभव करू. पण एका अरब देशाच्या डस्टबिनवर आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो पूर्णपणे चुकीच आहे. प्रत्येक हिंदुस्थानीने याला विरोध केला पाहिजे, परराष्ट्रमंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी’, असं म्हटलं आहे.

दरम्यान, नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा जगभरातून तीव्र निषेध केला जाऊ लागला आहे. शर्मा आणि जिंदाल यांचे वादग्रस्त विधान हिंदुस्थानला भोवले आहे. त्यांच्या विधानांचा निषेध करतानाच कतार, कुवेतपाठोपाठ इराणने रविवारी हिंदुस्थानी दूतावासाला समन्स बजावले आणि वादग्रस्त विधानांवर कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला.

Team Global News Marathi: