पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस, विविध राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली | देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.आजचा दिवस पंतप्रधानांसाठीखूप व्यस्त असणार आहे. आज पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेले ८ चित्ते सोडण्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.महाराष्ट्रातही १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

विविध राजकीय नेत्यांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्यांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Global News Marathi: