केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने बंडखोर माजी खासदार शिवाजीराव आढवरावांची वाढली चिंता

 

सध्या देशात भाजपचे १४४ मतदार संघात खासदार नाहीत या अनुषंगाने भाजपकडून वेगळी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. यासाठी ज्या मतदार संघात भाजप कमकुवत आहे किंवा भाजपचा उमेदवार नाही त्या भागात भाजपकडून आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू आहे.अशा मतदारसंघांमध्ये भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र १६, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती आणि मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सिंह यांनी तीन दिवसांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून भाजपच्या पुणे शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले कि, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघावर भाजप दावा सांगणार की ही जागा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिंदे गटाला सोडणार, हे नक्की नाही; तसेच आढळराव पाटील भाजपचे उमेदवार असतील की नाही, याबाबत आताच काहीही सांगू शकत नाही. पक्ष त्या वेळी याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे म्हणत केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी आढळराव यांच्यासह भाजपमधीलही इच्छुकांचे टेन्शन वाढविले आहे.

या पार्श्वभूमीवर ही जागा भाजप लढवणार की शिंदे गटासाठी सोडणार, भाजपने लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्षातीलच नेत्याला उमेदवारी मिळणार की ऐनवेळी आढळराव यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाणार, या प्रश्नावर सिंह यांनी, ‘याबाबत आताच काही सांगता येणार नाही. योग्य वेळी पक्ष योग्य निर्णय घेईल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मला जी पक्षबांधणीची जबाबदारी दिली आहे, ती निभावत आहे,’ असे सिंह यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: