पंतप्रधान अर्धवट कामांच्या उदघाटनासाठी येणे हे आपले दुर्दैव

 

पुणे | पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटले आहे. अशातच राष्ट्र्वादीने थेट पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार करून वेळ मिळाल्यावर आता नरेंद्र मोदी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पुण्यात येत आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झालेले असताना पंतप्रधानांना बोलवून शहर भाजपा त्यांची दिशाभूल करून पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

एकीकडे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अर्धवट विकासकामांच्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्यांचा निषेध काळे झेंडे न दाखवता मूक आंदोलनाने करण्यात येणार आहे.’ राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधानांच्या निषेधार्थ काही व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत. पालकमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित राहणार असले तरी राष्ट्रवादीतर्फे मूक आंदोलन केले जाणार आहे.

‘मेट्रोचे ३१ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान उदघाटनासाठी आले असते, तर आम्हाला आनंदच झाला असता. ५ किमीच्या मार्गाच्या उदघाटनासाठी येणे म्हणजे शहरातील फुलराणीच्या उदघाटनसाठी येण्यासारखे आहे आणि हे पहावे लागणे हे आपले दुर्दैव आहे, याकडेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्ष वेधले.

Team Global News Marathi: