पंतप्रधान मोदींच्या विश्वासू माणसावर माजी भाजप खासदाराचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

 

नवी दिल्ली | माजी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे अनेकदा मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेले असतात. आता त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

पुरी यांनी सरकारकडून श्रीलंकन तामिळ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. या पैशातून पुरी यांनी जिनीव्हामध्ये अपार्टमेंट खरेदी केले पण याची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली का? असा सवालही स्वामी यांनी केला आहे. “जेव्हा पुरी हे जिनिव्हामध्ये तैनात होते तेव्हा त्यांनी श्रीलंकन ​​तामिळांना सरकारने पाठवलेले पैसे वळवले आणि या लुटीतून जिनिव्हातील एका सुखसोयीनी युक्त भागात एक मोठे अपार्टमेंट विकत घेतले. मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाल्यावर त्यांनी याचा खुलासा केला होता का?” असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

माजी मुत्सद्दी अधिकारी आणि केंद्रीय मंत्री असलेले हरदीप सिंग पुरी हे राजीव गांधी (पंतप्रधान असताना कोलंबो येथे उपउच्चायुक्त होते. राजीव गांधींना केवळ लष्करी कमांडर आणि गुप्तचर संस्थांनीच नव्हे, तर त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोलंबोमधील तत्कालीन भारतीय उच्चायुक्तांनी आणि वरिष्ठ मुत्सद्दींनी सल्ला दिला होता का, हा श्रीलंकेतील प्रश्न योग्य वेळी सोडवायला हवा होता, असे एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Team Global News Marathi: