नोटांवर सावरकर अन् मोदींचा फोटो छापा, आ. राम कदमांच ट्विट

 

गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत, असे संजय निरुपम यांनी म्हटलंय.

गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्व कार्ड पुढे आणल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे भाजप नेत्यांनीही आता विविध नाव घेत नोटांवर फोटो छापण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातच, आमदार राम कदम यांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटोही ट्विट केला आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. अशा महापुरुषाचा फोटो नोटांवर टाकला तर योग्य राहील ही माझी भावना आहे असं त्यांनी सांगितले. अशातच आता आमदार राम कदम यांनीही एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. त्यावर, ४ फोटो असून त्यात वि.दा. सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली आहेत

Team Global News Marathi: