माझ्या घरातील सगळ्या व्यक्ती नका हो फोडू -वाचा पंकजा मुंडेनी कोणाला केली विनंती

मुंबई : नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी ही प्रामुख्याने राजकीय व्यासपीठावर पाहायला मिळते. पंरतु छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अशा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात यावेळी राजकीय टोलेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. कार्यक्रमात वसलेल्या थुकरटवाडीत नेहमीच हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची रेलचेल असते. पण यावेळी खुद्द एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या राजकीय मंडळींची हजेरी या कार्यक्रमात पाहायला मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली.

कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री देखील सहभागी झाल्या होत्या. नेहमीसारखीच हास्याची धमाल या कार्यक्रमात पाहायला मिळाली. सोबतच राजकीय टोलेबाजीही रंगलेली पाहायला मिळली. त्याचे झाले असे की, कार्यक्रमात सहभागी झालेल्या झोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला.

रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. त्यात अगदी चलाखीने घड्याळाचा देखील समावेश करण्यात आला होता. त्यात मोठा योगायोग असा की, पंकजा यांचे पती आणि सुजय विखे यांच्या पत्नी यांनी टाकलेली रिंग थेट घडाळ्यावर पडली. त्यानंतर तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू, असा टोला पंकजा यांनी रोहित पवारांना लगावला.

या

राजकारणात घड्याळ म्हटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह लक्षात येते. अशात खेळामध्ये योगायोगाने घड्याळावर पडलेल्या रिंगमुळे पंकजा यांनी रोहित पवारांना टोला लगावला. सुजय यांची पत्नी आणि माझा नवरा यांना फोडण्याचे काम रोहित करत असल्याची मिश्किल टिप्पणी पंकजा यांनी यावेळी केली.

त्यामुळे राष्ट्रवादीत असलेले बंधू धनंजय मुंडे यांच्याकडे पंकजा यांचा रोख होता, असे समजले तर काही वावगे ठरणार नाही. तर पंकजा यांच्या टोमण्यावर गप्प बसतील ते पवार कसले, “घरच्यांना माहित असते आपल्या माणसांसाठी काय चांगले आहे”, असे मजेशीर उत्तर रोहित यांनी दिले आणि मंचावर एकच हशा पिकला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: