शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस, या निमिताने संपूर्ण देशभरातून आणि तर राज्यभरातून शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होता आहे. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खासदार शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करून म्हणतात की, ‘शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.

‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’ अशा शब्दात नातू आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: