पंकजा मुंडे यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट |

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पोहचले होते. यावेळी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.सध्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून डावलल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर बढती देण्यात आली होती. यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंचे नाव चर्चेत असतानाही वगळल्याने अनके मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी पंकजा यांनी राजीनामे फेटाळत असल्याचे सांगत राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच मोदी, शहा, नड्डा हे माझे नेते आहेत, असे म्हटले होते.

भाजपाने बोलावलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा यांनी पाठ फिरविली होती. या घडामोडींवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी ही भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Team Global News Marathi: