“पंकजा मुंडेंचा भाजपत छळ होत असल्यास त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा”

 

काही दिवसांपूर्वी मंत्री मंडळात झालेल्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्यामुळे दोन्ही मुंडे भगिनी ह्या नाराज होत्या. त्यातच पंकजा मुंडे यांनी दिल्लीवरून आल्यानंतर थेट आपण नाराज नसल्याचे जाहीर करून नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.

त्यात पंकजा मुंडे यांचा भाजपात छळ होत असून त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून मी त्यांना सर्वात पहिले ऑफर दिली होती. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना कोणतं पद द्याचचं हे उद्धव ठाकरे ठरवतील, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंडे परिवाराचं काम मोठं आहे. त्यांच्या वारसदाराला कुठे न्याय मिळेल अशी समाजाची अपेक्षा होती. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. तसेच त्यांना शिवसेनेत स्थान आणि सन्मान दोन्ही मिळेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. यावर आता प्नकाजा मुंडे काय विधान करतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: