असं केल तर ठाकरे काय मोदी सुद्धा तुमच्या दारात येतील ! मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. करोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं.

प्रल्हाद मोदी म्हणाले की,’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही’, असं म्हणत त्यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य न होईलपर्यंत जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला.

मागण्या पूर्ण न होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, असं आंदोलन करा. तुम्ही असं केलं, तर उद्धव ठाकरेच काय; नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कुणी. आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही असं प्रल्हाद मोदी व्यापाऱ्यांना म्हणाले.

Team Global News Marathi: