पंकजा मुंडे विरोधकांवर कडाडल्या, म्हणाल्या…

पंकजा मुंडे विरोधकांवर कडाडल्या, म्हणाल्या…
ग्लोबल न्यूज: – दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात लोक भगवानगडावर आले. माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, एक दिवस आता आपल्याला शिवाजी पार्कही भरवायच आहे. तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणाही दिल्या.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, भाजपच्या राज्य कार्यकारिणीत न लागलेली वर्णी, गोपीनाथ मुंडे यांच्यासाथीने भाजप वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला दिलेली सोडचिठ्ठी या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या खास शैलीत तडाखेबंद भाषण केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: