बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत देणार मग उर्वरित देश हा बांगलादेश की पाकिस्तान आहे ?, उद्धव ठाकरेंचा सवाल


संघमुक्त भारत बोलणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात? उद्धव ठाकरेंचा सवाल 

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा  यंदा प्रथमच शिवतीर्थावर न होता सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे आणि या निवडणुकीत भाजपने मतदारांना आश्वासन दिलं की, बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत दिली जाईल. या मुद्द्याववरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना प्रश्न विचारला आहे.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

निवडणुकीनंतर कोरोनाची लस बिहारमध्ये मोफत देणार मग आमचा बाकीचा देश काय बांगलादेश आहे की पाकिस्तान आहे की कझाकिस्तान आहे. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना कारभार करायची ज्यांची लायकी नाहीये. जे देशात जर असं विभाजन करत असतील यांना फुकट आणि तुम्हाला विकत. केंद्र सरकार तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कोणती लस कुणी कोणाला दिली?

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली पण संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार यांच्या गळ्यात गळा तुम्ही घालत आहात. २०१४ साली पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याची वेळ आळी तेव्हा नितीश कुमार म्हणाले होते आम्हाला पंतप्रधानपदाचा चेहरा सेक्युलर हवा आहे. तो जर नसेल तर आम्ही युतीत राहणार नाही आणि त्यांनी युती तोडली. मग कोणती लस कुणी कोणाला दिली? नितीश कुमार हिंदुत्ववादी झाले? की की भाजपवाले सेक्युलर झाले? संघमुक्त भारत बोलणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात? 

बेडूक त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात: मुख्यमंत्री

देश संकटात आहे आणि हे राजकारण करत आहेत

हा देश म्हणजे एका पक्षाची मक्तेदारी नाही

राजकारणात विवेक पाळावा हे सरसंघचालकांचं वाक्य आहे

सरसंघचालकांचं भाषण उद्याच्या सामनात निट छापा 

राजकारण म्हणजे युद्ध नव्हे हे सरसंघचालकांकडून शिका

सरसंघचालकांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या

देव, मंदिर, पूजा, अर्चा, हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे

घंटा बडवा, थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व

गोव्यात गोवंश हत्या बंदी का नाही?

इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता

बाबरीवेळी शेपट्या घालणारे आता हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत

हिंदुत्वाबद्दल विचारणारे आहेत तरी कोण?

वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो फटका मारणारच

बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, वाघाची डरकाळी पाहून लपला

सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून त्या पक्षात

महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या छाताडावर गुढीपाडवा साजरा करेन

काही लोकांचा समाचार घेणं गरजेचं असतं

आज इकडचा शब्द तिकडे झाला तर गृहित धरा

आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून बोलतोय

आम्ही तुमच्यासारखे ढेपेलला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाही

वाघाची अवलाद आहे डिवचाल तर पस्तवाल

वाटेला जार तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

ग्लोबल न्युज नेटवर्क: