पंकजा मुंडे नाराज नाहीत, भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा;

 

मुंबई | मोदी यांच्या मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून फक्त एक वर्षांपूर्वी निवडणून आलेल्या भागवत कराड यांना मंत्री पदी नेमणूक केल्यामुळे तसेच दोन टर्म खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांना डावल्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपा पदाचा राजीनामा देण्याचे सत्रच सुरु केले होते. तसेच पंकजा मुंडे यांनी आज मुंबई आपल्या समर्थकांशी संवाद साधला होता, यावर आता भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं आहे. भाषणात जरी त्यांनी कौरव, पांडव, धर्मयुद्ध असे काही शब्द वापरले असले किंवा दृष्टांत दिले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना काय संदेश दिला, काय निर्देश दिले हेच राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. भाषणाचा मतितार्थ काढायचा असतो आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा मतितार्थ म्हणजे कार्यकर्त्यांनी राजीनामे परत घ्यावे आणि कामाला लागावे.

तसेच पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत असा विश्वास आहे. पंकजा मुंडे यांच्याशी आपलं नेहमीच बोलणं होत असतं. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही नुकतंच भेटलो होतो. मी दाव्याने सांगू शकतो की त्या नाराज नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नयेत, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे. तसेच कार्यकर्त्यांना राजीनामा न देण्याचे आव्हान बावनकुळे यांनी केले आहे.

Team Global News Marathi: