‘माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा’ पंकजा मुंडे यांचे नाव न घेता फडणवीसांना टोला |

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्याचे सूत्र सुरु केले होते. त्यातच आज मुंबई येथे पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी नाव न घेता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.

माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधल्याने राजकीय वऋतुलात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं.

Team Global News Marathi: