पंकज त्रिपाठी वारंवार साऊथ चित्रपटांच्या ऑफर्स नाकारतायत कारण की,

 

अभिनेते पंकज त्रिपाठी दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे. पंकज त्रिपाठी यांनीही बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. आज प्रत्येक चित्रपट निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. या प्रतिभावान अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये खूप मागणी आहे, त्यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीतूनही अनेक ऑफर येत आहेत, पण पंकज त्रिपाठीला त्यांनी कोणत्याही साऊथ चित्रपटात काम करावे असे वाटत नाही.

साऊथ फिल्म इंडस्ट्री आज झपाट्याने चमकत आहे. बॉलिवूडचे सर्व कलाकार या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास तयार आहेत तर पंकज त्रिपाठी या इंडस्ट्रीतून एकामागून एक ऑफर नाकारत आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या अभिनेत्याला साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा का नाही, जेव्हा कि 2003 मध्ये एका कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी पंकज त्रिपाठीने काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे, मात्र आज ते या इंडस्ट्रीतून येणाऱ्या ऑफर्स नाकारत आहेत. वास्तविक, अभिनेत्याला केवळ दक्षिणेतच नाही तर हॉलिवूड किंवा इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे नाही. गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये झालेल्या संवादादरम्यान पंकज त्रिपाठी यांनी याचे कारण सांगितले आहे.

पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘माझ्यासाठी भाषा हा अडथळा नाही, पण मी हिंदी सिनेमाला प्राधान्य देतो. कारण मला हिंदी आवडते. मला ती भाषा कळते. मला त्याच्या भावना, बारकावे चांगल्या प्रकारे समजतात. हॉलिवूड विसरा, मला तेलगू आणि मल्याळम चित्रपट निर्मात्यांच्या ऑफर आल्या आहेत, पण मला वाटते की मी त्या चित्रपटांना न्याय देऊ शकणार नाही असे अंत त्यांनी मांडले

Team Global News Marathi: