पंढरपुरात उद्धव ठाकरेंचा राजू शेट्टींना धक्का; ‘हा’ नेता शिवबंधन बांधणार?

 

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे, शिंदे गट अशा सर्वच राजकीय पक्षात इन्कमिंग व आऊटगोईंग मोठ्याप्रमाणात सुरू आहे. याचाच फटका आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील बसला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बागल यांचा राजीनामा राजू शेट्टी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चळवळीतील आक्रमक नेते म्हणून रणजित बागल यांना ओळखले जाते. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने आणि मोर्च्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रान पेटवले होते. मात्र, आता बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत असून हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का मानला जातात आहे .

बागल राजीनामा पत्रात म्हणाले, आदरणीयसाहेब, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले सात ते आठ वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यानंतर २०२० साली आपण मला स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता अशी महत्वपूर्ण जबाबदारी दिली. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपण दिलेली संधी म्हणजे कधीही न फिटणारे उपकार आहेत.

Team Global News Marathi: