पंढरपूर पोटनिवडणूक : अवताडे उमेदवारी अर्ज दाखल करणार,नेत्यांची फौज पंढरीत येणार

पंढरपूर मंगळवेढा  : राष्ट्रवादीचे आमदार भरत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगताना दिसून येणार आहे. एकीकडे राष्ट्र्वादीने भरत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदा होणारी पोट निवडणुकी अधिक चुरशीची होणार असेच चित्र दिसून येत आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आज उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार समाधान अवताडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह आमदार विनायक मेटे, गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, खासदार रणजित निंबाळकर व खासदार जय सिद्धेश्वर स्वामी उपस्थित राहणार आहेत.

कोण आहेत समाधान अवताडे जाऊन घेऊया

समाधान आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक व चेअरमन आहेत. तसेच उद्योजक म्हणून नागरिकांना चांगलेच परिचित आहेत. समाधान आवताडे यांनी २०१४ साली शिवसेनेकडून पंढरपूर, मंगळवेढा निवडणूक लढवली होती. तर २०१९ साली अवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, यामध्ये त्यांचा कमी फरकाने पराभव झाला होता. ग्रामीण भागामध्ये अवताडे गटाचे चांगलेच वजन आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भालके यांना जोरदार टक्कर देताना आवताडे दिसून येणार आहे.

Team Global News Marathi: