संजय राऊत यांच्यासारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा – संजय निरुपम

मुंबई राज्यात मागच्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडीवर शिवसेना खासदार संजय राऊत ट्विटच्या माध्यमातून तसेच सामना अग्रलेखातून भाष्य करत आहेत. त्यामुळे आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच अजितदादा पवारांनी आघाडीत मिठाचा खडा टाकू नये असे खडेबोल राऊतांना सुनावले होते.

आता त्या पाठोपाठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय निरुपम त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘संजय राऊत यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांना पोलिसांमध्ये परत घेण्याच्याविरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावं, असं संजय निरुपम म्हणाले.

तसेच आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तिथे त्यांची याचिका फेटाळली गेली आणि त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगण्यात आले. आता त्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Global News Marathi: