…पण आमचा लढा थांबवू शकत नाही, सुषमा अंधारेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

 

मागील २० दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, अब्दुल सत्तार यांना शेतीमधील काही ज्ञान नाही. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नये.

तसेच शिक्षकांच्या व्यथा आम्ही उपमुख्यमंत्र्यांनाच थेट सांगत आहोत. कारण आम्हाला माहीत आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून शिक्षकांचे प्रश्न सुटणार नाही. कारण ते शेवटी उपमुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहे. दिवाळीच्या तोंडावर लोकं आंदोलन करत आहेत. त्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर वर्षावर दिवाळी साजरी करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राणे पिता-पुत्रांवर पोलीस कारवाई करत नाहीत. माझ्यावर भास्कर जाधव आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. तुम्ही केसेस कराल… केसेस करून थकाल. पण आमचा लढा थांबवू शकत नाही, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

बाटगे, अस्पृश्य, वाळीत टाकणे, पुन्हा परत घेणे, ही जातव्यवस्था कायम ठेवणारी वाक्य ही फक्त मनुवादी संस्कृती जपणारे लोकच वापरू शकतात. आशिष शेलार हे मनुवादी संस्कृतीचे वाहक आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करणे फार नवलाचे नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Team Global News Marathi: