भाजपनंतर आता राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत पक्षप्रवेश

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून त्या दरम्यान मनसेमध्ये मोठी इनकमिंग झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपनंतर मनसेचंही टार्गेट बारामती असल्याचं चित्र आहे. या दौऱ्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. पुणे महापालिका, मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील दौरे देखील वाढले आहेत.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खडकवासला, भोर, वेल्हा आणि मुळशीतील काही पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे . पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकादेखील राज ठाकरे यांनी आज केल्या आहेत. पक्ष बांधणीसाठी अनेकांना सूचनादेखील त्यांनी यावेळी केल्या आहेत.

बारामतीत मनसे ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीत मनसे नेते वसंत मोरे बारामतीत गेले होते. त्यानंतर आज बारामतीतील अनेकांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या निवणुकांसाठी मनसेचं टार्गेट बारामती असल्याचं चित्र आहे.

राज ठाकरे सकाळी लॉ कॉलेज रोडवरील राजमहल या त्याच्या घरातून लवकर बाहेर पडले होते. घराबाहेर त्यांना वासुदेवाचं दर्शन घडलं. यावेळी वासुदेवाने आणि राज ठाकरेंनी फोटोसेशन केलं आणि त्यानंतर राज ठाकरे नवी पेठेतील मनसे कार्यलयाकडे रवाना झाले. यावेळी कार्यालयातील पदाधिकारी राज ठाकरेंच्या स्वागताच्या तयारीत होते. मात्र राज ठाकरे वेळेच्या आधीच पोहचल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.

Team Global News Marathi: