पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

 

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबाराला पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजारी लावत, आपल्या समस्यांचे समाधान होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना नागरिकांना पालकमंत्री या नात्याने भेटता यावे, त्यांच्या समस्यांचे समाधान करता यावे या करीत मागील महिन्यापासून व्हि व्हि आय पी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री कार्यालय चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयातील पहिला जनता दरबार काल पार पडला.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी शहरातील महिला, जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी – युवक युवती यांची भेट घेत त्याच्या प्रशासकीय कामातील अडथळे दूर करण्याचा आणि समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ” पालकमंत्री कार्यालयात संपन्न झालेल्या ‘जनता दरबारा’द्वारे नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. लोकांच्या अडचणी कमी वेळेत सोडवणे महत्त्वाचे असते. त्यानुसार जनसामान्यांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावता आल्याचे समाधान वाटते असे मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री म्हणून नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु झालेला हा जनता दरबार नक्कीच पुण्यातील नागरिक आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील सेतू म्हणून काम करणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये आपले प्रश्न निश्चितच मार्गी लागतील हा विश्वास निर्माण झाला आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: