ब्रेकिंग | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज साधणार पत्रकार माध्यमांशी संवाद

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना काय भूमिका घेणार, संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तसेच राऊतांवर करण्यात आलेली ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातं आहे.

उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

तसेच काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली. तसेच शिवसैनिकांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलं होतं. तर शिवसेनेतून वेगळे झालेल्या शिंदे गटाने तसंच भाजपने देखील संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती.

मात्र शिवसेनेची अधिकृत भूमिका समोर आली नव्हती. संजय राऊत सातत्याने शिवसेनेची बाजू मांडत होते. त्यामुळे आता शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, काय बोलणार याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

“ईडीचा गैरवापर होतोय, सभागृहात चर्चा व्हावी”,  सेना खासदाराचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र

राजभवनाकडे निघाला होता मोर्चा आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Team Global News Marathi: