संजय राऊतांची चौकशी 600 मराठी लोकांनी तक्रारी केल्या म्हणून लागली

मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे बोलताना म्हणाले की, संजय राऊतांची चौकशी 600 मराठी लोकांनी तक्रारी केल्या म्हणून लागली आहे. यामध्ये भाजपाचा काहीही संबंध नाहीयं. 600 मराठी कुटुंबांची घरे राऊतांनी हडप केलीत असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी थेट संजय राऊत यांच्यावर लगावला होता ते आज माध्यमांशी बलताना बोलत होते.

तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना काय भूमिका घेणार, संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तसेच राऊतांवर करण्यात आलेली ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातं आहे.

ब्रेकिंग | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज साधणार पत्रकार माध्यमांशी संवाद

“ईडीचा गैरवापर होतोय, सभागृहात चर्चा व्हावी”,  सेना खासदाराचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र

 

Team Global News Marathi: