पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा सक्रीय; शिवसेना प्रवक्त्यांची तातडीची बैठक

 

मुंबई | . शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेना प्रवक्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काय ठरणार याची उत्सुकता आहे. तसेच या बैठकीमध्ये विरोधकांना चितपट करण्यासाठी नवी रणनीती आखली जाऊ शकते असे बोलले जात आहे.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर पक्षाची भूमिका कोण मांडणार याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेची भूमिका संजय राऊत हे परखड आणि रोखठोक मांडत होते. ते मुख्य प्रवक्ते होते. त्यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेपुढे आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेची भक्कम बाजू मांडण्यासाठी आता कोण असणार, याची उत्सुकता आहे.

मुख्यप्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर माध्यमांमध्ये पक्षाची बाजू आक्रमकरित्या येणे बंद झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अनुपस्थित पक्षाची भूमिका मांडण्यासंदर्भात सर्व प्रवक्त्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्य मागासवर्ग आयोग सदस्य आज शिवसेना प्रवेश करणार आहेत. आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके आज उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मागासवर्ग आयोग सदस्य हाके शिवसेनेत दाखल होत असल्याने शिवसेनेला याचा फायदा होणार आहे.

Team Global News Marathi: