पक्षबांधणी सुरू असताना शिवसेना नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी उधळले अंगावर पैसे!

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्ष फुटल्यामुळे नव्याने पक्ष बांधणीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोर दिला आहे. अशातच नव्याने पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले जात आहे. पण, जळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना पैसे उडवल्याचा प्रकार घडला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन सभा जळगावात पार पडली. याच सभेच्या दिवशी धरणगावामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने जंगी कार्यक्रम पार पडला. कार्यकर्त्यांकडून गुलाबराव वाघांवर पैसे उडवण्यात आले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीकडे शिवसेना नेत्यांकडून पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्यात येत असताना पदाधिकाऱ्यांकडून मात्र उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव येथे घेतलेल्या प्रबोधन सभेत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला असून यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच सुषमा अंधारे यांनी ” नथनी या कही बार साद बदल देते है, पुण्य की आड मे पाप बदल देते है, मतलब के लिए कोई लोग अपने बाप बदल लेते है” असं म्हणत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Team Global News Marathi: