पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी एकत्र या, रविकांत तुपकर यांचे आवाहन

 

राज्यातील सोयाबीनआणि कापूस उत्पादकांच्य प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे.

दरम्यान, पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र या असं आवाहन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे. सहा नोव्हेंबरला होणाऱ्या एल्गार मोर्चाची संपूर्ण जिल्हाभर तयारी सुरु आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर हे सध्या ठिक-ठिकाणी शेतकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह रविकांत तुपकर हे गावागावात जात आहेत. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. सहा नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चासाठी त्यांना विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सहा नोव्हेंबरला जगदंबा माता मंदिर चिखली रोड बुलढाणा ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काडण्यात येणार आहे. या मोर्चात हातात रुम्हणं घ्यायचं… अन् दुपारी मोर्चात यायचं…असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: