मी चौकशीला जाणार नाही; किशोरी पेडणेकरांनी मांडली भूमिका

 

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी केलेले आरोप पेडणेकर यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच हे दबावतंत्र असल्याचा आरोप करत दादर पोलीस स्थानकात चौकशीला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कसेही करून मला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी सोमय्या यांच्यावर केला.

किशोरी पेडणेकर यांची काल (२८ ऑक्टोबर) चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान, ज्या एसआरए गाळ्यावरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, तिथेच त्यांनी माध्यमांसमोर गाळेधारकांसोबत बातचीत केली. दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, असा आरोपही त्यांनी केली.

सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असेही त्या सोमय्या यांना उद्देशून म्हणाल्या

गोमाता नगरमध्ये मी २०१७ साली अर्ज भरला होता. कारण नसताना आता या सगळ्या प्रकरणाची पुन्हा राळ उठवली जात आहे. गोमातामध्ये काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. हे गाळे किशोरी पेडणेकर यांचे आहेत, असे एक जरी गाळेधारक बोलला तर लगेच कुलूप लावण्याचे आव्हान त्यांनी केले. एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असून न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे असेही त्या म्हणाल्या.

Team Global News Marathi: