पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध,अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार स्वतः उद्घाटन?

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याती वाद सर्वश्रुत आहेत अशातच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राजमाता पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण सोहळ्यावरून नवीन राजकीय डाव टाकला आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला असून पुतळा अनावर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. २ एप्रिलला शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

मात्र त्यापुर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुतळ्याच अनावरण करण्याच्या तयारीत असल्याची माहितीसमोर आली आहे. शरद पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यास पडळकरांनी विरोध केला आहे. यापूर्वीही जेजुरीमध्ये पडळकरांनी स्वत:च मेंढपाळ आणि महिलांना सोबत घेऊन पुतळ्याचं अनावरण केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी विरूद्ध पडळकर असा मोठा वाद उभा राहिला होता.

आता पुन्हा एकदा शरद पवारांना होळकरांच्या पुतळ्याच अनावरण करू देणार नाही असा पवित्राच पडळकरांनी घेतला आहे. आता पुतळ्याचे अनावरण मेंढपाळांच्या हस्ते की पवारांच्या हस्ते यावरून पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जेजुरीत काय घडलं? मागील वर्षी जेजुरी संस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी इथं पुर्णाकृती पुतळा उभारला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदल्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे अनावरण केल्याचं जाहीर केलं होतं

Team Global News Marathi: