‘आप’ आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, घेणार केवळ १ रुपया मानधन

 

अमरगढचे आमदार आणि आम आदमी पक्षाचे नेते जसवंत सिंग यांनी निवडणुकांपूर्वी लोकांना दिलेलं पहिलं वचन पूर्ण केलं आहे. जसवंत सिंग यांनी केवळ १ रुपया वेतन आणि पेन्शन सोडणार असल्याचं वचन जनतेला दिलं होतं. आपलं राज्य अगोदरच आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळे मी तिकीट मिळाल्यानंतर केलेल्या घोषणेची पूर्तता करत असल्याचं सिंग यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी नाभाचे आमदार गुरदेवसिंग देव मान यांनीही १ रुपयाच वेतन घेणार असल्याचे घोषित केले होते.

जसवंत सिंग हे आपल्या भागात आरोग्य, शिक्षण आणि इतत सुविधांसाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे पुढील काही महिन्यांतच मतदारसंघात हा बदल झालेले दिसून येईल, असे त्यांना वाटते. व्यापार आणि सामाजिक कार्याशी जोडला गेलं असल्याने मी सर्वच नागरिकांसाठी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळेच, बहुतांश मतदारांना मी व्यक्तीश: ओळखतो. आपल्या सरकारने पहिल्याच दिवशीपासून कामाला सुरुवात केली आहे. मी मतदारांना निवडणुकांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे गंभीरतेने पाहतो.

सिंग यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना मोठ-मोठी आश्वासनं दिली नाहीत. त्यांनी केवळ तीच आश्वासनं दिली, जी पूर्ण केली जाऊ शकतात. मी मतदारांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे, इतर पक्षाच्या नेत्यांसारखं मतदारांना मूर्ख बनवायला आलो नाही, असेही जसवंतसिंग यांनी म्हटले.

Team Global News Marathi: