पश्चिम महाराष्ट्रातील महापूरला कारणीभूत असलेले ‘कर्नाटकातील अलमट्टी धरण’ आजही ओव्हर-फ्लो

 

कोल्हापूर | काही दिवसातच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तरीही कर्नाटकातील अलमट्टी धरण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणात कोयना, राधानगरी, चांदोली, दूधगंगा भरपूर असा पाणीसाठा साठवून आहे. ह्या धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे धोक्याची घंटा लक्षात येत असून महापुराची भीती कोल्हापूर आणि सांगली येथील नागरिकांच्या मनात असल्याची दिसून येते.

महापुराचा धोका टाळण्यासाठी स्थानिक प्रशाशनाने धरणातील पाणीसाठा कमी करणे गरजेचे आहे. सांगली, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराला कारणीभूत अलमट्टी धरण असून बॅकवॉटर मुळे धोका निर्माण होतो. हे आता पर्यंत दिसून आले आहे. माघील वर्षी अलमट्टी धरणात ५०८ मीटर पाणीपातळ व पाणीसाठा २३ टीएमसी एवढा होता

मात्र यावर्षी पाणीपातळी हि ५१० मीटर असून ३४.४० एवढा पाणीसाठा धरणात सध्या उपलब्ध आहे. म्हणजेच माघील वर्षी पेक्षा जास्त पाणीसाठा यंदा अलमट्टी धरणात आहे. अलमट्टी धरणाची पातळी ५१६ मीटर गेली कि महापुराचा धोका निर्माण होईल सुरवात होते. म्हणूनच अलमट्टी धरणातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा हा भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

Team Global News Marathi: