हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, मलिकांचा धक्कादायक जबाब

 

मनी लाँड्र्रिंग प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा शेरा न्यायालयाने दिल्यानंतर अजून एक सत्य ईडीच्या तपासात बाहेर आलं आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने नवाब मलिक यांचा जबाब नोंदवला आहे. हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा धक्कादायक जबाब राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीला दिला आहे.

मलिकांनी जबाबात हसिना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असं कबूल केलं. २००२ सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, असंही मलिक यांनी सांगितलं.

गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा भाग आहे. २००५ साली मलिक यांनी सलीम पटेलविषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता.

हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची. गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला ५ लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते सेही जबाबात सांगण्यात आले आहे.

Team Global News Marathi: