ऑक्सिजनची नागरिकांना आवश्यकता भासूच नये – आदित्य ठाकरे

 

संभाजीनगर | सध्या संपूर्ण राज्यभरात कुरणा आटोक्या येत असला तरी अद्याप काही जिल्यांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथे मेल्ट्रॉन येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए प्लांट) उदघाटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडले.

सर्वांनी जबाबदारीने या संकटापासून वाचण्यासाठी सातत्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर याचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या ऑक्स‍िजनची अधिक आवश्यकता भासू नये, अशी इच्छा पर्यटन, पर्यावरण आण‍ि राजश‍िष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केली होती.

यावेळी ठाकरे म्हणाले की, कोविड काळात आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येत काम केले. यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनासह खासगी क्षेत्रातील प्रत्येकाने सर्वतोपरी मदत केलेली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्स‍िजनची आवश्यकता राज्याला भासू लागली. याचा अनुभव लक्षात घेऊन राज्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर भर दिला आहे असे यावेळी त्यांनी बोलिं दाखविले होते.

Team Global News Marathi: