सेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला शुभेच्छा

 

कल्याण | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार कपिल पाटील यांची थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.

आज पासून ठाण्यात या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा सोमवारी काढली जाणार आहे.

प्रथमच आगरी समाजातील एखाद्या नेत्याला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे सुपूत्र सुमित भोईर यांनी हा बॅनर लावला आहे. यावर सुभाष भोईर आणि कपिल पाटील यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Team Global News Marathi: