ऑक्सिजन वाहून नेणार्‍या टँकरना राष्ट्रीय महामार्गावर टोल मधून सूट !

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यातील इतर राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. मात्र अनेक राज्याच्या सीमा पार करताना टोल भरावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्राने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकर आणि कंटेनरला टोल नाक्यांवर टोल न भरण्याची मुभा देण्यात आली आहे. म्हणजे कोणताही टोल भरावा लागणार नाही आहे. कोरोना संसर्गामुळे देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची सध्याची अभूतपूर्व मागणी लक्षात घेता, लिक्विड मेडिकल रुग्णवाहिकांसारख्या अन्य आपात्कालीन वाहनांप्रमाणेच दोन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजन असलेल्या कंटेनरला गणले जाईल.

फास्टटॅगच्या अंमलबजावणीनंतर टोल प्लाझा जवळ प्रतीक्षा काळ जवळपास संपुष्टात आला असला तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मेडिकल ऑक्सिजनच्या शीघ्र आणि सलग वाहतुकीसाठी अशा वाहनांना आधीच मार्गिका प्राधान्य दिले आहे. प्राधिकरणाने त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि इतर हितधारकांना महामारी विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि खासगी प्रयत्नांना कृतीशील मार्गाने मदत करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Team Global News Marathi: