देशाला PM आवास नको श्वास हवा, पुन्हा राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका !

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या देशाच्या चिंतेत अधिक वाढ करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत बांधण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करून मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.


राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला जोरदार टोले लागले आहे . देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.


राहुल गांधी यांनी शनिवारीच मोदींवर जीएसटी वसुलीवरून टीका केली होती. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल यांनी केली होती. या ट्विटसोबत त्यांनी जीएसटी हा हॅशटॅगही वापरला होता.

Team Global News Marathi: