धक्कादायक! कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करण्यासाठी घेतले जातात ५० हजार रुपये

हैदराबाद । कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आपल्याला पहायला मिळत आहे. या कोरोना काळात माणुसकीला काळिमा फासणारी अनेक दुष्कृत्य सुद्धा समोर आली आहेत. यातच आजून एक भर म्हणजे कोरोनाने मृत्यू पावलेल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे.

सदर घटना ही हैदराबाद येथे घडून आलेली आहे. हैद्राबादमधील एका महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तिच्या पतीला गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने तिच्या पतीचा मृत्यू झाला. पण तिचा पती कोरोनाबाधित असल्याने त्या महिलेला मृतदेह ताब्यात घेता आला नाही.

परंतु या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे तिने सांगितले. तसेच या महिलेने ५० हजार रुपये देऊन ही तिच्या पतीवरती कुठे आणि कसे अंत्यसंस्कार झाले याची माहिती देखील त्या महिलेला दिले नाही. असे देखील या महिलेने सांगितले आहे.

दरम्यान, कोरोणामुळे देशात भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे काही लोक या कोरोनाच्या संकट काळात आपला आर्थिक फायदा बघत आहेत.

Team Global: