नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकार तसेच आरोग्य विभागाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात आता पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
त्यात रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल १,२२,२१.६६५ वर गेला आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.
तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (1 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२,३३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,२२,२१.६६५ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,६२,९२७ पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ५,८४,०५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.