मुकेश अंबानीच्या घराबाहेर मिळलेली गाडी रिलायन्स कंपनीच्या नावावर

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता या संदर्भात आणखी काही माहिती समोर येत आहे.

मुंबईतल्या अल्टामाऊंट रस्त्यावरील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवण्यात आलेल्या गाडीत वेगवेगळ्या नंबर प्लेट सापडल्या आहेत..तसेच गाडीत सापडलेल्या चिठ्ठीत घातपात करण्याची धमकीही देण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडीवर असलेला MH01DK9945 हा नंबर रिलायन्स कंपनीच्या नावावर आहे. तसेच विक्रोळीतून ही गाडी हरवल्याचे म्हटले आहे.

मुकेश अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ घराजवळ स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती, या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली. यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या कारची कसून तपासणी करण्यात आली. स्फोटकं सापडल्यामुळे मोठा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.तसेच एक धमकी दिलेली एक चिट्ठी सुद्धा सापडली आहे.

Team Global News Marathi: