“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, सत्यता तपासावी लागेल” – नाना पटोले

 

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीला चांगलेच अडचणीत आणले होते. एका पाठोपाठ एक आरोपांच्या फैरी झाडत फडणवीसांनी विधानसभा हदरवून सोडली. फडणवीसांनी सादर केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

फडणवीसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या पेनड्राईव्हमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. अनेक नेते भाजपमधील नेत्यांना संपवण्याचा कट करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या आरोपांवरून आणि पुराव्यांवरून खिल्ली उडवली आहे.

जे काही व्हिडीओज विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत. स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असा खोचक टोला नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणावरूनही पटोलेंनी निशाणा साधला आहे. त्यांनीही सत्तेचा दुरूपयोग करून फोन टॅपिंग केलं आहे. यंत्रणांचा दुरूपयोग करायची भाजपची सवय आहे. फडणवीस सरकारपासून ही प्रथा पडलीय, अशी टीका देखील नाना पटोलेंनी केली आहे.

Team Global News Marathi: