राज्यात कृषी विधेयके लागू होऊ नयेत यासाठी आमचा प्रयत्न – अजित पवार

पुणे – कृषी सुधारणा विधेयके शेतकरी हिताची नाहीत. या विधेयकांना अनेक शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांचा देखील या विधेयकांना तीव्र विरोध आहे. ही विधेयक लागू करण्यासाठी केंद्र सरकारची एवढी घाई का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने  १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्या अत्याधुनिक ॲम्बुलन्स खरेदी करण्यात आले आहेत. या ॲम्बुलन्सचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: