आमच्या लाडक्या अमृता फडणवीसांना काही काम नाही, शिवसेना नेत्या मनीषा कायदे यांनी लगावला टोला

 

पुणे | एका कार्यक्रमानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या पुण्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुण्यातील लॉकडाऊन, राज्यपाल कोश्यारी दौरा तसेच महाविकास आघाडीवर भाष्य करत ठाकरे सरकारला टोला लगावला होता. आता त्यांच्या या टिकेचा शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतंही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी, अशी बोचरी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आहे म्हणून घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करायचं आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचं, असं डबल ढोलकी वाजवण्याचं काम अमृता वहिनींचं चालू आहे. त्यामुळे पुणेकरांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम केलं तर बरं होईल, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती.

Team Global News Marathi: