आपल ते बाब्या, दुसऱ्याच ते कारट’ नीलम गोऱ्हे यांची भाजपावर सडकून टीका !

 

भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नसून मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे, यावर टीका करत मुख्यमंत्र्यांनी विना पंचनामा करता पूरग्रस्त भागात मदतीचे पॅकेज का दिले असा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती.

आता या टीकेला शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. केंद्र सरकारचे गुजरात वर जास्त प्रेम आहे. गुजरात सरकारला न मागता १ हजार कोटी रुपये दिले, मात्र महाराष्ट्र सरकार ला काहीच नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

आपल ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कारट अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मदत करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा गुजरातमध्येच आपली कृपादृष्टी करणाऱ्या प्रधानमंत्री यांच्याकडून केंद्रामार्फत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असा टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: