आमचा मुख्यमंत्री लयभारी, देशात नंबर १ ठरलेल्या उद्धव ठाकरेंना मनसेने लगावला टोला |

 

मुंबई | प्रश्नम या संस्थेकडून देशातील एकूण १३ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी संदर्भात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एक सर्वे करण्यात आल होत. या सर्वेक्षणामध्ये मूयंत्रि उद्धव ठाकरे अव्वल ठरले होते. कुरणा संसर्गाच्या काळात केलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी त्यांना अव्वल स्थानी पोहचवले होते. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी या मुद्यावरून त्यांच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे, लक्ष्मी रोडची मिसळ, जगात भारी…पुण्याची मस्तानी जगात भारी..चितळेंची बाकरवडी जगात भारी..तसाच तो सर्वे वाटतोय..”आमचा मुख्यमंत्री जगात भारी”, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

१३ राज्यांतील १७ हजार ५०० जणांनी सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये, कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढीलवेळी हेच मुख्यमंत्री हवेत, असे पर्याय देण्यात आले होते. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत.

 

Team Global News Marathi: